कांडवेल फाट्यावर विद्यार्थ्यांचे रास्ता रोको

0

निंभोरा : येथून जवळच ऐनपुर रस्त्यावरील कांडवेल फाट्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला. धामोडी, कांडवेल येथील मोठ्या प्रमाणात मुले, मुली ऐनपूर व खिर्डी येथे कॉलेज, शाळेत ये-जा करतात. परंतू रावेर एसटी आगाराने कांडवेल बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत होते. शाळेत वेळेवर पोहचता येत नव्हते. यासाठी विद्यार्थ्यांना बससाठी रास्ता रोको करावे लागले.

यावेळी डेपो मॅनेजर खोडपे यांना निंभोरा येथील सुनील कोंडे, वाघाडीचे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, सागर चौधरी यांनी फोन करून कल्पना दिली व घटनास्थळी बोलाविले. यावेळी सर्व बसेस सुरु करण्याचे आश्वासन रावेर डेपो मॅनेजर खोडपे यांनी दिल्यावर विद्यार्थ्यांनी रस्ता मोकळा केला. यावेळी निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर पाकळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.