रावेर– तालुक्यातील कांडवेल शिवारातून शेतकरी धनराज विश्वनाथ बोरसे, ज्ञानेश्वर धनगर तसेच नाना पाटील यांच्या मालकिच्या विहिरीत चोरट्यांनी हजारो रुपये किंमतीच्या केबल वायर लांबवल्या. या प्रकरणी धनराज बोरसे यांच्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.