कांताई बंधार्‍यात पाय घसरल्यानंतर तिघांना वाचवण्यात यश मात्र एक जण वाहिला

One Person Washed Away in Kantai Dam : Three Survived जळगाव : जिल्ह्यात पाच भाविकांचा श्री विसजर्नादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रविवारी पुन्हा ट्रीपसाठी आलेल्या मुलांपैकी एकाचा पाय घसरल्यानंतर बचाव करताना चौघे बुडू लागल्याने सतर्कतेने तिघांना बचावण्यात यश आले तर एक जण वाहिल्याची बाब समोर आली. जळगावच्या गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधार्‍यावर रविवारी ही घअना घडली. शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारची ट्रीप काढलल्यानंतर एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात असताना तिघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा शोध सुरू आहे.

तिघांना वाचवण्यात यश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर परिसरातील दुध फेडरेशन जवळ मिथिला अपार्टमेंटमधील 10 ते 15 मुलांनी कांताई बंधारा नागाई- जोगाई मंदिर परिसरात रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा शोध सुरु आहे.

जिल्हा रुग्णालयात गर्दी
समीक्षा विपीन शिरडुकर (17), योगीता दामू पाटील (20) आणि सागर दामू पाटील (24) या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती असून नयन योगेश निंबाळकर (14) याचा शोध अद्याप सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली. वाचविण्यात यश आलेल्या तिघं मुलांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नागाई- जोगाई मंदिर परिसरात असलेल्या गिरणा नदीच्या पात्राच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडली.