The body of ‘that’ young man who was washed away in the Kantai Dam has finally been found जळगाव : जिल्ह्यात पाच भाविकांचा श्री विसजर्नादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रविवारी पुन्हा कांताई बंधार्यावर पर्यनासाठी आलेल्या जळगावच्या मिथीला अपार्टमेंटमधील मुलांपैकी चौघे सेल्फि काढण्याच्या नादात बंधार्यात पडली मात्र सतर्कतेने तिघांना बचावण्यात यश आले तर एक तरुण वाहून गेला होता. 24 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह हाती लागला. रविवारी सुटी असल्याने मिथीला अपार्टमेंटमधील मुले पर्यटनासाठी कांताई बंधार्यावर पेाहोचली मात्र याचवेळी पाय घसरल्याने चौघे बुडू लागताच तिघांना वाचवण्यात यश आले तर नयन योगेश निंबाळकर (17) हा तरुण पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याचा मृतदेहच सोमवारी दुपारी हाती लागला.
तिघांना वाचवण्यात यश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर परीसरातील दुध फेडरेशन जवळ मिथिला अपार्टमेंटमधील 10 ते 15 मुलांनी कांताई बंधारा नागाई- जोगाई मंदिर परीसरात रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी फोटो काढताना एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात असताना तिघांना वाचविण्यात यश आले तर नयन वाहून गेला होता. 24 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा सोमवारी दुपारी मृतदेह हाती आला.
तिघांना वाचवण्यात यश
दामू पाटील (20) व सागर दामू पाटील (24) या बहिण-भावासह समीक्षा विपीन शिरोडकर (17) यांना वाचवण्यात यश आल्यानंतर त्यांना जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले तर नयन योगेश निंबाळकर (17) या तरुणाचा सोमवारी दुपारी मृतदेह आढळला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. मयत नयनच्या पश्चात आई, वडील व बहिणी असा परीवार असून त्याचे वडिल दूध विकास संघात कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.