मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन
आंबेगाव : शासनाने कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या प्रति क्विंटल 200 रुपये अनुदानासाठी विक्री कालावधीत वाढ केलेली आहे. राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 दरम्यान आपल्या कांद्याची विक्री करणार्या उत्पादकांना 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सापती देवदत्त निकम यांनी केले आहे.
1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 दरम्यान विकलेल्या कांद्याला शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत. कांदा प्रस्ताव अनुदानासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या आवारामध्ये कांदा विक्री केलेली शेतकरी पट्टी, सातबारा उतारा, आधाकार्ड, बँक खाते नंबर इत्यादींसह कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या नावाने अर्ज सादर करावे. तसेच एखाद्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावाने आणि कांदा विक्रीपट्टी मुलाच्या नावे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे असेल तर सातबारा उतार्यावर पीक पाहणीची नोंद आहे. अशा प्रकरणात वडील व मुलगा किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या सहमतीने बाजार समितीकडे शपथपत्र सादर करावे. तसेच सातबारा उतारा ज्यांच्या नावाने असेल त्यांच्या खात्यावरती सदरची अनुदान रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी कांदा अनुदानाच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती देवदत्त निकम यांनी केले.