चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत 800 रुपयाने घट झाली. तर बटाट्याच्या आवकेत वाढ होऊन भाव ही वाढले. हिरव्या मिरचीची आवक वाढून भाव स्थिर राहिले. चाकणला या सप्ताहात पालेभाज्यांची आवक घटली. गुरांच्या बाजारात या सप्ताहात गाय-बैलांच्या विक्रीत वाढ झाली. बाजारातील एकुण उलाढाल 3 कोटी 15 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 3584 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2263 क्विंटलने वाढून भावात 800 रुपयांनी घट झाली. कांद्याचा कमाल भाव 4000 रूपयांवरून 3 हजार 200 रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1 हजार 776 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 676 क्विंटलने वाढली व बटाट्याचा कमालभाव 1100 रुपये प्रतीक्विंटलवर स्थिरावला. भूईमुग शेंगाची एकूण आवक 17 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने घटली. या शेंगांचा कमालभाव 6000 रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक 22 क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने घटून लसणाचा कमाल भाव 4 रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 415 क्विंटल झाली असून, हिरव्या मिरचीचा कमालभाव 3000 रुपयांवर स्थिर राहिला. टोमॅटोची आवक 1018 क्रेट होऊन 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 4 लाख 80 हजार जुड्यांची आवक होऊन 101 ते 550 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 3 लाख 15 हजार जुड्यांची आवक होऊन 100 ते 701 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपूची 45 हजार जुड्यांची आवक होऊन 200 ते 900 रुपयांचा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :-
कांदा – एकूण आवक – 3584 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 4 हजार रुपये, भाव क्रमांक : 2700 रुपये, भाव क्रमांक 3 : 1500 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1776 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 1100 रुपये, भाव क्रमांक 2 : 700 रुपये, भाव क्रमांक 3 : 500 रुपये.
फळभाज्या :– चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-
टोमॅटो – 1018 पेट्या ( 500 ते 1000 रू. ), कोबी – 315 पोती ( 800 ते 1300 रू. ), फ्लॉवर – 533 पोती ( 400 ते 500 रु.), वांगी – 419 पोती ( 1000 ते 2000 रु.), भेंडी – 411 पोती ( 15,00 ते 25,00 रु.), दोडका – 222 पोती ( 1000 ते 1800 रु.), कारली – 111 डाग ( 1000 ते 2000 रु.), दुधीभोपळा – 200 पोती ( 500 ते 1000 रु.), काकडी – 217 पोती ( 300 ते 500 रु.), फरशी – 60 पोती ( 4000 ते 5000 रु.), वालवड – 418 पोती ( 1500 ते 2500 रु.), गवार – 115 पोती ( 3000 ते 4000 रू.), ढोबळी मिरची – 350 डाग ( 2500 ते 3500 रु.), चवळी – 112 पोती ( 1000 ते 2000 रुपये ), वाटाणा – 450 पोती ( 3000 ते 4000 रुपये), शेवगा – 532 डाग ( 2000 ते 3000 ) रुपये
पालेभाज्या :- चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : –
मेथी – एकूण 32 हजार 222 जुड्या ( 200 ते 450 रुपये ), कोथिंबीर – एकूण 25 हजार 195 जुड्या ( 200 ते 400 रुपये ), शेपू – एकुण 6 हजार 575 जुड्या ( 200 ते 600 रुपये ), पालक – एकूण 5 हजार 395 जुड्या ( 200 ते 500 रुपये ).
जनावरे :-चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 118 जर्शी गायींपैकी 82 गाईची विक्री झाली. ( 20000 ते 45000 रुपये ), 215 बैलांपैकी 162 बैलांची विक्री झाली. ( 15,000 ते 25,000 रुपये ), 117 म्हशींपैकी 85 म्हशींची विक्री झाली. ( 20000 ते 50000 रुपये ), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 5310 शेळ्या – मेंढ्यापैकी 4930 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10000 रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 80 लाखाची उलाढाल झाली.