कांद्याला चांगला भाव

0

राजगुरुनगर । खेड तालुक्यात दोन टप्प्यात कांदा पीक घेतले जाते. या वर्षी पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील कांदा पीक पोषक हवामानामुळे चांगले आले आहे. गेल्या चार-पाच वर्षापेक्षा यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला.

प्रथम टप्प्यातील कांद्याला अडीच हजार ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. दुसर्‍या टप्प्यात लागवड जास्त झाल्याने आवक वाढली. त्यामुळे बाजारभाव 1500 ते 1700 पर्यंत स्थिरावला. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे. काही शेतकर्‍यांनी बटाटा पीक काढून पुन्हा कांदा लागवड केली आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी आहे. परिणामी औषध फवारणीचा खर्च वाचत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.