नाशिक-राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते मात्र योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कांद्याला १ रुपये प्रती किलो देखील दर मिळत नसल्याने शेतकरी अत्यंत संतप्त आहे. नाशिकच्या एका शेतकऱ्याने चक्क कांदा विक्रीतून आलेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठविले होते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या अंदरसुल येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा विक्रीतून आलेले पैसे पाठविले आहे.
चंद्रकांत भिकन देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना ५४५ किलो कांदा विक्रीतून आलेले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठविले. चंद्रकांत देशमुख जेंव्हा कांदा विकायला बाजारात घेऊन गेले तेंव्हा त्यांच्या कांद्याला फक्त ५१ पैसे प्रती किलो दर मिळाला, यावरून ते संतप्त झाले.