कागदपत्रांमध्ये हेराफेरी करीत भूखंड विक्री : माजी आमदारांसह सात जणांविरोधात गुन्हा

Sale of plot through forged documents : Case against seven persons including former MLA Gurmukh Jagwani जळगाव : जळगावचे माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांच्यासह सात जणांविरोधात भूखंडांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्हा ग्रामसुधार समितीच्या मालकीची पिंप्राळा शिवारात असलेली जमीन संस्थेच्या कागदपत्रात हेराफेर करून तसेच संस्थेची कागदपत्रे गैरमार्गाने मिळवीत विक्री केल्याचा उभयंतांविरोधात आरोप आहे.

खोटे कागदपत्रांच्या आधारे भूखंड विक्री
व्यापारी अशोक नामदेव राणे (भोईटे नगरजवळ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अजगर अजीज पटेल (रा.भादली, ता.जळगाव) जळगाव जिल्हा ग्राम सुधार समिती, कानळदाचे बनावट सचिव यांनी दि. 13 मार्च 2013 रोजी खोटी माहिती असलेला अर्ज 89992 क्र.05/2013 व त्यासोबत मा. धर्मदाय आयुक्त नाशिक यांचे कार्यालयात खोटे व बनावट दस्तऐवज दाखल करीत त्यांची दिशाभुल करून 13 जून 2013 रोजी जमिन विक्री अनुषंगाने त्यांचे हिताचे आदेश पारीत करुन घेवुन संपुर्ण प्रक्रिया बनावट व खोटी असल्याचे माहीत असतांना सदर जमिन विक्री व्यवहारासाठी जळगाव पीपल्स को ऑफ बँक लि. गणेश कॉलनी शाखा, जळगाव येथे बनावट कागदपत्र दाखल करुन खाते क्रमांक 0060111000 0008 असे उघडले. 19 जूलै 2013 रोजी एकूण 48 पानांचा खरेदी खत क्रं.-4003/2013 अन्वये गुरुमुख मेहरुमुल जगवाणी यांना संस्थेची पिंप्राळा शिवारातील गट क्रं.- 338 / 1 क्षेत्र 66 आर, गट क्रं. – 339/ अ क्षेत्र 95 आर असे अंदाजे 5 ते 6 कोटी रकमेचे एकुण क्षेत्र 01 हेक्टर 69 आरहा भुखंड विक्री करीत संगनमताने व कट कारस्थान रचुन आरोपी क्र. 1 ते 7 यांनी संस्थेची फसवणूक केली आहे वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
अशोक राणे रा.भोईटे नगर यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसात अजगर अजीज पटेल, गुरुमुख मेहरूमुल जगवानी, हरीष के.मंधवानी, निलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळंकी, मीना विठ्ठल सोळंकी, एच.ए.लोकचंदानी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.