काजोलची बॉलिवूडमध्ये पंचवीशी पूर्ण

0

मुंबई | काजोलने आपल्या चित्रपट कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण केली असून त्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. ४२ वर्षाच्या काजोलने १९९२ मध्ये रोमँटिक बेखुदी मध्ये पदार्पण केले होते तिच्या. लग्नानंतर मात्र तिची बॉलिवुडसेवा कमी झाली असं म्हणतात.

काजोलने तिची आई अभिनेत्री तनुजा आणि वडिल दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्या सोबतीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तिने २५ वर्षांचा दीर्घ प्रवास…इतकं रसिकांचं प्रेम, खरोखरच धन्य झाले. असा संदेशही काजोलने ट्विट केलाय. काजोलप्रमाणेच तिचा सहकारी शाहरूख खान यानेही फिल्म इंडस्ट्रीमधील २५ वर्षे नुकतीच म्हणजे २५ जून रोजी पूर्ण केलीत. शाहरूख आणि काजोल बाझीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि दिलवाले या फिल्ममध्ये एकत्र होते.