काटेरी काठीने फौजदारचा कान कापला

0

अमळनेर । कॉपी पुरवायला येणार्‍या तरुणास हटकले म्हणून काटेरी काठीने पोलिसांचा कान कापल्याची घटना 23 रोजी अमळगाव येथे आदर्श हायस्कूल मध्ये घडली. 23 रोजी अमळगाव येथे बारावीची परीक्षा सुरू असताना निमझरी येथील तरुण योगेश भानुदास कोळी याने खोली क्र. 3 च्या खिडकीमधून काॅपी देण्याचा प्रयत्न केला असता होमगार्डने त्याला हटकण्याचा प्रयत्न केला त्याने होमगार्डला शिवीगाळ केली म्हणून सहाय्यक फौजदार प्रभाकर भामरे यांनी त्याला हटकले असता तो पळून गेला व नंतर बाभळाची काटेरी काठी व दगड घेऊन आला पोलिसांच्या अंगावर दगड फेकून जवळ येऊन काटेरी काठीने कानावर मारले त्यामुळे भामरे यांचा कांन फाटला अशाही अवस्थेत आरोपीला पकडून त्यांच्याविरुद्ध भादवी 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली तपास स पो नि अवतारसिंग चव्हाण करीत आहेत.