काटेवाडीतील शिक्षिकेची आत्महत्या

0

सहकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

बारामती । काटेवाडी येथील मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. उमा विजय गिरीगोसावी असे शिक्षिकेचे नाव आहे. शाळेतील काही सहकारी शिक्षक आणि अधिकार्‍यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून उमा गिरीगोसावी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत संबंधितांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

एक वर्षापूर्वी गिरीगोसावी यांचे प्रशिक्षण सुरू होते. कटफळ येथे असताना काहीतरी प्रकार घडला असल्याचे उमाने सांगितल होते. गिरीगोसावी यांनी संविधान वाचन घ्यावे, असा आग्रह धरला. त्यावर तेथे काही शिक्षकांनी मागून येवून आम्हाला शिकवायला लागले, असे म्हणून त्यांना तिला देण्यास सुरूवात केली होती, अशी माहिती उमाचे नातेवाईक अशोक गिरी यांनी दिली.

गटशिक्षण अधिकार्‍यासह विस्तार अधिकारी, ग्रामीण पोलिस ठाणे, पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. बारामती शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्या नेहमी म्हणायच्या शाळेत जायला नको, शिक्षकांनी नकोसे केले आहे. त्यामुळे मला काम करू वाटत नाही. या सगळ्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला उमा गिरीगोसावी यांची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास पोलिस हवालदार जाधव करीत आहेत.