पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील काटे पिंपळे पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह वाहत येताना एका इसमाला दिसला. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वीच मृतदेह पाण्यात बुडाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतू मृतदेह आहे कि आणखी काही याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
एका नागरिकाने तो मृतदेह वाहत येताना पाहिला. त्याने तातडीने अग्निशामकदल व पोलिसांना कळवले. मात्र, तोपर्यंत तो मृतदेह दिसेनासा झाला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी व पिंपरी अग्निशामक दल व रहाटणी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून शोधकार्य सुरू आहे.