जळगाव-काथार कंठहार वाणी समाजातर्फे विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील १२० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शहरातील शेठ. नागो गणू वाणी समाज मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक राजेंद्र वाणी, समाजाचे अध्यक्ष उमाकांत वाणी, उपाध्यक्ष विवेक वाणी, निलेश पंडीत, सहसचिव संध्या वाणी, भानुदास वाणी, सतिष वाणी, देविदास वाणी, नंदकुमार नांदेडकर, वसंतराव बाविस्कर, विजय वाणी आदि उपस्थित होते.
दरम्यान शोभा वाणी यांनी स्वागतगीत सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या १२० विद्याथ्यार्ंचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव केला. त्यानंतर ज्योती वाणी यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर करुन माणसाच्या जीवनाता योगाचे काय महत्व आहे. याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.