कानपूर-एलटीटी व विरांगना लक्ष्मीबाई-पुणे एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ

Increase in duration of Kanpur-LTT and Virangana Lakshmibai-Pune Express भुसावळ : रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची अतिरीक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर व विरांगना लक्ष्मीबाई-पुणे-विरांगना लक्ष्मीबाई या विशेष ट्रेनच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा आहे गाड्यांचा कालावधी
गाडी क्रमांक 04151 विशेष गाडी 2 डिसेंबर ते 31 मार्च 2023 दरम्यान 18 फेर्‍या वाढविण्यात आल्या असून ही प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता कानपूरहून सुटेल व शनिवारी दुपारी 2.55 वाजता एलटीटीला पोहोचेल. गाडी क्रमांक 04152 विशेष गाडी 3 डिसेंबर ते 1 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत एकूण 18 फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहुन निघेल व रविवारी दुपारी 3.25 वाजता कानपूरला पोहोचेल. 04152/0451 विशेष ट्रेनच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गाडी क्रमांक 01922 विशेष गाडी बुधवार, 16 नोव्हेंबर ते 29 मार्च 2023 दरम्यान एकूण 20 फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी 12.50 वाजता विरांगना लक्ष्मीबाईहुन सुटल्यानंतर गुरुवारी दुपारी 11.35 वाजता पुण्यात पोहोचेल. गाडी क्रमांक 01921 विशेष गाडी 17 नोव्हेंबर 2022 ते 30 मार्च 2023 या तारखे पर्यंत एकुण फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 3.15 वाजता पुण्याहून सुटल्यानंतर शुक्रवारी सकाळी 9.35 वाजता विरांगना लक्ष्मीबाई पोहचेल. 01922/01921 विशेष ट्रेनच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.