कानळदा येथे अवैध दारुचा साठा पकडला

0

जळगाव : लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीचे दुकाने बंद असल्याचा गैरफायदा घेत मध्य प्रदेश निर्मित अवैध दारु विक्री करणार्‍या चौघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी तालुक्यातील कानळदा येथे पकडले. नरेंद्र पुरुषोत्तम सपकाळे, योगेश सुरेश सपकाळे, विशाल मनोज पारधी, प्रशांत प्रल्हाद पाटील (सर्व रा.कानळदा, ता.जळगाव) अशी चौघांची नावे असुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ममुराबाद रस्त्यावर कानळदा शिवारात अवैध दारुचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन.बी.दहिवडे, दुय्यम निरीक्षक व्ही.एम.पाटील, सागर वानखेडे, सत्यविजय ठेगडे, भरत दौंड, सहायक दुय्यम निरीक्षक दिनकर पाटील,भूषण परदेशी व रघुनाथ सोनवणे यांच्या पथकाने कानळदा शिवारात धाड टाकली असता वरिल चौघांजवळ हा साठा आढळून आला. मोठ्या आकाराच्या ७५० मिलिच्या ८० बाटल्या व दोन दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दारु मध्य प्रदेश निर्मित असून कर चुकवून महाराष्ट्रात त आलेली आहे, मात्र ती बनावट आहे का याची चौकशी पथक करीत आहे.