जळगाव। शहरातील कानळदा रस्त्यावरील रेणुका माता मंदिरासमोरून तवेरा कार चोरीला गेल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेंदालाल मिल परिसरात मन्सुरखान नुरखान (वय-33) हे कुंटूंबियांसोबत राहतात. तर गॅस रिपेअरिंगचे काम करून आपल्या कुटूंबाचा उरनिर्वाह करतात. गेल्या दोन वर्षापूर्वी मन्सुरखान यांनी तवेरा (क्रं.एमएच.23.ई.9931) ही शेख सलीम शेख मजिद (रा.रावेर) यांच्याकडून खरेदी केली होती. दरम्यान, 9 एप्रिल 2017 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तवेरा कार बंद पडल्याने मन्सुरखान यांनी तेवरा त्यांच्या घरासमोरील कानरळदा रस्त्यावरील रेणुका माता मंदिरामसोर उभी केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुसर्या दिवशी 10 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते मंदिराजवळ आल्यानंतर त्यांना त्यांची कार गायब झालेली दिसली. परिसरात शोध घेतल्यानंतर दोन लाख रुपये किंमतीची तेवरा कार चोरीला गेल्याची त्यांना खात्री झाली. यानंतर आज बुधवारी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.