कानुबाई मातेला भावपूर्ण निरोप !

0

धुळे। खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेला मिरवणूक काढत वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्यात फुगड्यांचा फेर धरून परिसरातून वाजत-गाजत शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी जाधव परीवारातील सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.