Bodwad farmer died of poisoning while spraying the field बोदवड : शहरातील प्रभाकर रामदास दहातोंडे (57) या प्रौढ शेतकर्याचा गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास कपाशीवर औषध फवारणी करताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.
विषारी औषध पोटात गेल्याने मृत्यू
शेतकरी दहातोंडे हे गुरुवारी आपल्या उजनी रस्त्यावरील शेतात कपाशी पिकावर फवारणी करीत होते मात्र विषारी औषध त्यांच्या तोंडात गेल्यानंतर त्यांना विषबाधा झाली व उलटी व मळमळ होवू लागताच त्यांना सरकारी दवाखान्यात आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बोदवड पोलिसात या प्रकरणी अरविंद प्रभाकर दहातोंडे (29) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार युनूस तडवी करीत आहे.