कापूसवाडीतील तरुणाची आत्महत्या : सहा आरोपींना अटक

जामनेर : तालुक्यातील कापूसवाडी येथील 38 वर्षीय तरुणाने व्याजाच्या तगाद्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 6 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. उत्तम रघुनाथ धोनी (38, रा. कापूसवाडी, ता.जामनेर) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून आठ आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जामनेर पोलिसात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिघा पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

या आरोपींना पोलिसांकडून अटक
उत्तम धोनी यांच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र जगदेव काशीकर (57), भगवान जगदेव काशीकर (54), प्रकाश रामरतन जाधव (40), विजय राजेंद्र काशीकर (28), गणेश रमेश काशीकर (32), विक्रम प्रल्हाद सोनवणे (37) या आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना जामनेर न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत अर्थात चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात तिघे पसार असून त्यात एका महिलेचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहेत.