कापूस उत्पादक शेतकर्‍रांसाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत चर्चासत्र

0

शहादा । कापसाचे उत्पन्न कसे वाढेल हा प्रयत्न कापुस उत्पादक शेतकर्‍यांनी करावा. शेतीत वेगवेगळे प्रयोग प्रामाणिकपणे केल्यास उत्पन्न वाढते शेती संबंधी शेतकर्‍यांना चांगले ज्ञान व माहिती मिळावी म्हणून आज कापुस उत्पादक शेतकर्‍यांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले. शेतीत होणारी भाव वाढ व उत्पादन याचा ताळमेळ शेतीउत्पादनात असायला पाहिजे असे प्रतिपादन सुतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले. जयप्रकाश नारायण सुतगिरणीचा आवारात कापूस उत्पादन वाढ तंत्रज्ञान चर्चा सत्राचे आयोजन केले होते त्यात दीपक पाटील बोलत होते.

उत्पादनापेक्षा प्रतिवर भर द्या…
शेतकरी स्वाभीमानाने जगला पाहिजे हे स्व. पी के अण्णाचे स्वप्न होते . शेतीत शेतकरी व शेतमजूर महत्वाचे घटक आहेत. पण सध्या शेतकर्‍यांना दिशाहीन करणार्‍याची संख्या वाढली आहे असा आरोप ही केला शेतकरी लाचार होता कामा नये. शेतकर्‍यांचा मुलगा मोठा व्हायला पाहिजे. शेती करावयाची असेल तर वेळेच बंधन आवश्यक असले पाहिजे असे आव्हान केले. प्रा. डॉ. महाजन यांनी मार्गदर्शन करतांना शेतीत गुणवत्ता महत्बाची असते. उत्पादनापेक्षा प्रतीवर भर द्यावा. कापुस शुध्द असावा. देशात सर्वात जास्त कापुस महाराष्ट्रात लागवड होतो. शेतीत व्यवस्थापन महत्वाचा घटक आहे. बियाणे चांगले खरेदी करा असे सांगुन सविस्तर मार्गदर्शन केले.

या मान्यवरांची उपस्थिती
व्यासपीठावर धुळे कृषी महाविद्यालयाचे डॉ. एम.एस. महाजन, जळगाव तेल बिया संशोधनाचे डॉ संजीव पाटील, कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. कुंदे आंबोडा जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी अमृतराव देशमुख, सोनेसांगवी जिल्हा बीड येथील बभृवाण कणसे, सुतगिरणी व्हा. चेअरमन रोहिदास पाटील, जि. प. कल्याण सभापती आत्माराम बागले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील,व्हा. चेअरमन जगदीश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनिल पाटील, उपसभापती रविंद्र रावल, प. स सभापती दरबारसिंग पवार, नगीन काळु पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, विजय विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. टी. पाटील सह मान्यवर उपस्थित होते.

सेंद्रीर खताद्वारेच वाढते क्षमता
एकरी 42 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेणारे बीड जिल्ह्यातील शेतकरी बभृवाण कणसे यानी मार्गदर्शम करताना कापुस लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली तयार केली पाहिजे. सुरुवातीलाच सर्व प्रकरची सेंद्रीय खते जमीनीत टाकली पाहिजे. त्यामुळे जमीनीची उत्पादन क्षमता वाढते. खालुनच पिकाना ताकद दिली तर कापसाचे 50 ते 60 बोंडे लागतात. मी तीन एकर शेतीत 120 क्विंटल कापसाचे उत्पादन केले. एकात्मिक व्यवस्थापन ही प्रक्रीया राबवली गेली पाहिजे. कापसावरील लाल्या रोगाची माहितीच आमचा पतिसरात नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संजीव पाटील यांनी शास्र युक्तपध्दतीने कापुस लागवड, प्रा कुंदे यांनी बिज संस्कार व प्रक्रीया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर एकरी 50 क्विंटल कापसाचे उत्पादन घेणार्‍या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी कापसाची शेती कशी करावी. एकरी उत्पादन कसे वाढवावे याचा सविस्तर अनुभव कथन केला.