मुंबई । मे. कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांच्या थकित वेतनासाठी केंद्रीय प्रादेशिक श्रम आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, शासनाच्या धोरणानूसार कामगारांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रचलित कामगार कायद्याच्या तरतूदीनुसार व्यवस्थापनेविरुध्द कठोर कार्यवाही करण्याबरोबरच कामगारांचे थकीत वेतन व इतर भत्ते मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. मे.कंबाटा एव्हिएशन कंपनीचे कामकाज ऑगस्ट 2016 पासून बंद झाले असून कंपनी व्यवस्थापनाने कायदेशीर देणी अद्यापपर्यंत कामगारांना दिलेली नाही.