जळगाव। शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीमधील सोलर अॅग्री पंप मोटर विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारानेच 25 हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला असून याप्रकरणी कंपनीच्या सिक्युरिटी सुपरवाईझरने दिलेल्या फिर्यादीवरून कामगाराविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणियार शेख शकुर हे शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली येथे सिक्युरिटी सुपरवाईझर म्हणून कार्यरत असून ते कंपनीत येणार्या कामगारांची तपासणी करतात तर कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपास करतात.
13 एप्रिल रोजी सीसीटीव्ही फुटेज तपासत असतांना अजंता रिसोर्सेस सर्विसेस प्रा.लि. बांभारी या कॉन्ट्रॅक्अर एजन्सी मार्फत जैन व्हॅलीत सोलर अॅग्री पंप मोटर उत्पादन विभागात कंत्राटी कामगार म्हणून कामाला असलेला नारायण रामदास सपकाळेच्या हालचाली ह्या संशयास्पद दिसून आल्या. मणियार शकुर यांनी वरीष्ठांना ही बाब सांगितल्यानंतर नाराणय सपकाळे याच्या कर्मचार्यांनी लक्ष ठेवले. दुसर्या दिवशी सपकाळे हा सायंकाळी जुन्या मोटारींमधून निघालेले तांबे ठाकून त्याच्या पट्या तयार करत बुटात व कमरेत बांधून तसेच अॅप्रॉनमध्ये झेवून जातांना दिसून आला. यानंतर सपकाळे याने आतापर्यंत 25 हजार रुपय किंमतीचे तांब्याचे तार चोरून घेऊन गेल्याचे निषन्न झाले. त्यानंतर आज गुरूवारी मणियार शकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण सपकाळे याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.