वाहतूक काही काळ विस्कळीत
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही घटना रविवारी दि. 19 सकाळी घडली. मात्र, कामशेत वाहतूक विभागातील होमगार्ड वार्डन गणेश गव्हाणे व तुषार घाडगे यांनी वेळीच घटनास्थळी जाऊन एका ट्रकचालक आणि त्यातली मजुरांच्या सहाय्याने दरड बाजूला केली. त्यामुळे वाहतूक तातडीने पूर्वपदावर आली. दरड कोसळल्याने मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे वाहतूक मंदावली होती. शिवाय यामध्ये एक मोठा खडक निसटला होता. त्यामुळे हा खडक पावसाच्या तडाख्याने खाली पडल्यास पूर्ण महामार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, कामशेत वाहतूक विभागाचे दोन वार्डन गव्हाणे आणि गाडगे यांनी तेथून जाणार्या एका ट्रकला थांबवून त्यातील मजुरांच्या मदतीने महामार्गावर आलेली दरड बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.