कामशेत बोगद्यात विचित्र अपघात

0

कामशेत : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्यामध्ये रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे पाच वाहने एकमेकांवर धडकली. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

सुदैवाने कुणीही जखमी नाही
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडे निघालेल्या टँकरला मागील बाजूने एक कार धडकली. त्या कारच्या मागून येणार्‍या एका कार चालकाने हा अपघात पाहून जोरात ब्रेक दाबला असता त्या कारच्या मागून येणारे दुसरे वाहन त्या कारवर धडकले. त्यानंतर आणखी एक वाहन धडकल्यामुळे हा विचित्र अपघात घडला. मार्गावर ऑईल सांडल्यामुळे हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही.