एरंडोल । मी कासोदा पंचायत समिती गण क्र 89 ची जनरल महिला या जागेसाठी शिवसेना तिकीटावर उमेदवारी करत आहे. माझे पती महेश ओंकार पांंडे हे देखील माजी ग्रामपंचायत सदस्या असून गेली 12 ते 15 वर्षे राजकारणाशी संलग्न असल्याची माहिती शिवसेना उमेदवार पद्मा महेश पांडे यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले. पती शिवसेनेचे सेनेचे जुने कार्यकर्ते असून सध्या ते कासोदा शहरप्रमुख आहेत. ते ग्रामपंचायत सदस्य असतांना माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने कासोदा शहराची पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून 72 लाख रुपये मंजूर करुन अंजनी धरण ते कासोदा नवीन पाईप-लाईन टाकून गावाचा पाणी प्रश्न सोडविला आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार
गावाच्या विकासासाठी त्याकाळी आमदार निधीतून जवळपास एक कोटीची कामे त्यात वाणी समाज मंगल कार्यालय, भोई मंगल कार्यालय, गोविंदा महाराज सभा मंडप, इंदिरानगर सुभा मंडप, मारोती मंदिर सभा मंडप, इंदिरा गांधी शौचालय, बिर्ला चौक व वार्ड क्र.2 मधील काँक्रिटीकरण, जय-सियाराम मित्र मंडळ व्यायाम शाळा अशी गावात विविध विकास कामे केली असून मतदारांनी मला निवडून दिल्यास कासोदा गणात विविध विकास कामे राबविणार, हागणदारी मुक्त करणार, चांगल्या आरोग्य सेवा पुरविणार, जनसामान्यांचे प्रश्न सोडविणार अशी विविध कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहिल. आदिवासी व दलित समाजाच्या नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. गोरगरीबांची तसेच सर्वसामान्य जनतेची कामे व्हावी. यासाठी मी शिवसेनाच्या माध्यमातून उमेदवारी घेतली आहे.