कायदा बदल व्हावा यासाठी जनआंदोलन

0

नंदुरबार। अल्पवयीन मुलाने खून केल्यास त्यास लगेच जामीन मंजूर केला जातो.त्यामुळे जनमानसात प्रतिक्रिया उमटतात. हा कायदा बदल करण्यात यावा. या मागणीसाठी 9 ऑगस्ट या क्रांतिदिनापासून जनआंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी दिली.लोकमान्य टिळक वाचनालयात संघटनेची दि. 15 जुलै रोजी बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय झाला. नंदुरबार येथील डी. आर.हायस्कुलमधील विद्यार्थी राज ठाकरे याचा दोन अल्पवयीन मुलांनी गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे.पोलीसानी या मुलांना पुराव्यासह अटक केली.मात्र गुन्हा करणारे हे मुले अल्पवयीन असल्याने बाल न्यायालयाने त्यांना 24 तासातच जामीन मंजूर केला.त्यामुळे लोकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

क्रांतिदिनापासून आंदोलन
या पार्श्वभूमीवर प्रवाशीसंघटनेची बैठक घेण्यात येऊन हा कायदा बदल करण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलाचे वय न पाहता केलेला गुन्हा पाहून कठोर शिक्षा देणारा कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. यासाठी 9 ऑगस्ट या क्रांतिदिनापासून आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालक, विद्यार्थी, वकील, यांच्याशी संवाद साधण्यात येईल. निवेदन सुप्रीम कोर्ट,राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गजेंद्र शिंपी यांनी दिली. बैठकीला रत्नदीप पानपाटील, कैलाश्चंद्र अग्रवाल, पंकज पाठक, सुरेश सोपणार,गणीभाई मेमन,संतोष मराठे,शोएब खाटीक, अझर सुलतान,भक्तवत्सल सोनार,राहुल महिरे, सोनू ठाकूर आदी उपस्थित होते.