कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही

0
अहिरवाडी येथे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे
रावेर– गावात कायदा-सुव्यवस्था हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही. किरकोळ वादामुळे जर कोणी दोन समाजात तेढ निर्माण करत असेल तर अशा उपद्रवींचे नाव पोलिसांना सांगा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी अहिरवाडी येथे दिली. चार दिवसांपूर्वी अहिरवाडी येथे बकर्‍या चारण्याच्या कारणावरुन दंगल उसळली होती. रावेर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानंतर दंगल वेळेवर आटोक्यात आली होती. गावात दंगलीनंतर ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीती कायम असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर निरीक्षक पिंगळे यांनी बैठक घेतली.
गावात कुणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्यांचे नाव सांगण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, फौजदार दीपक ढोमने, कॉन्स्टेबल मंदार पाटील यांच्यासह गावाचे सरपंच राहुल पाटील, शेतकरी व दुकानदार उपस्थित होते.