कायदा हातात घेतल्यास गुन्हेगारांची गय नाही

0

शांतता समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांचेे प्रतिपादन

धुळे : धुळे शहर चांगले असलेतरी दंगलीमुळे बाहेरील गुंतवणूक दारांना येथे भरोसा नसल्याने विकास खुंटला आहे. यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच तरुणांनीदेखील कायदा हातात घेऊ नये अन्यथा पोलीस कुणाचीही गय करणार नाहीत, असा सज्जड इशारा अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिला. गजानन कॉलनी परीसरातील झालेल्या दोन गटातील दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर आझाद नगर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ज्या लोक अप्रिय घटनेस जबाबदार आहेत त्यांना वठणीवर आणू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 20 रोजी रात्री अरिहंत मंगल, कार्यालय गजानन कॉलनी परीसरातील घडलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्‍वभूमीवर 21 रोजी सायंकाळी आझाद नगर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, हिरामण गवळी, नाना कर्पे, आप्पा खताळ, हाजी शव्वाल अन्सारी, वसीम खाटीक, हिलाल माळी, फारुख शाह, संजय शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वतोपरी शातंता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. धुळेकरांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतताा राखण्यासाठी सहकार्य केल्याने उपविभागीय अधिकारी जाधव यांनी पोलीस दलाच्या वतीने आभार मानले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे ते म्हणाले. प्रसंगी प्रभारी अधिकारी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, देवपूर ठाण्याचे निरीक्षक निकम, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सतीश सपकाळे, परदेशी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

दगडफेक प्रकरणी 11 जणांना अटक
दगडफेक करून तणाव निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही गटातील 11 आरोपींनी चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.