जळगाव : झी-24 तास या वृत्तवाहिनीने बोगस शिक्षकांबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नेमके किती शिक्षक कार्यरत आहेत याची यादीच जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नेमक्या किती बोगस शिक्षकांची भरतीय झालीय याची माहिती समोर आल्यानंतर मुन्नाभाई बनलेल्या शिक्षकांच्या वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यभरात सात हजार 880 बोगस शिक्षक
राज्यात सात हजार 880 बोगस शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती आधीच जाहीर केल्यानंतर आता झी 24 तास वृत्तवाहिनीने आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच मिळविली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यानिहाय बोगस शिक्षकांची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात 614 बोगस शिक्षक
यात जळगाव जिल्ह्यात तब्बल 614 शिक्षक गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले असल्याचे दर्शविण्यात आले आहेत. हा आकडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे. जळगावसह धुळे आणि नाशिकमध्ये बोगस शिक्षक मोठ्या प्रमाणात असल्याचे या आकडेवारीतून दिसून आले आहे.
अशी आहे बोगस शिक्षकांची आकडेवारी
या आकडेवारीत प्रत्येक जिल्ह्यानुसार बोगस शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. मुंबई दक्षिण- 40, मुंबई पश्चिम- 63, मुंबई उत्तर- 60, रायगड- 42, ठाणे- 557, पालघर- 176, पुणे-395, अहमदनगर- 149, सोलापूर- 1171, नाशिक- 1154, धुळे – 1002, जळगाव- 614 नंदुरबार- 808, कोल्हापूर- 126, सातारा- 58, सांगली- 123