कारखान्याच्या जीवावर अनेकांनी राजकीय पोळी भाजली -माजी मंत्री एकनाथराव खडसे

0

बेलगंगा साखर कारखाना देणार दोन हजार रुपये टन भाव : उत्साहपूर्ण वातावरणात गाळप हंगाम शुभारंभ

चाळीसगाव- तालुक्याचे वैभव असलेला बेलगंगा साखर कारखान्याचे नावाने अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजली निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या ही, एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांचा भाग्यविधाता असलेला कारखाना बंद असताना तो चित्रसेन पाटील यांच्या माध्यमातून सुरू होऊ नये यासाठी अनेकांनी पुण्य खर्च केले मात्र चित्रसेन पाटील यांनी सहकाराच्या पलिकडे जात कारखाना सुरु करुन शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा हा धाडसी निर्णय अनेकांच्या मनात धडकी भरवणारा आहे एवढेच नव्हे तर तालुक्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा वनवास आज संपला असल्याचे प्रतिपादन माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते आज अंबाजी संचलित बेलगंगा साखर कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी प.पू.1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, हभप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली केशरानंद सरस्वती महाराज , माजी गृह निर्माण मंत्री सुरेशदादा जैन, गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सतीश पाटील,आमदार किशोरआप्पा पाटील, आ.शिरीष चौधरी, बुलढाणा अर्बन बँकेचे राधेशामजी चांडक, जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त अ‍ॅड.कृष्णा ठोंबरे, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, राजीव देशमुख, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र राठोड या मान्यवरांच्या हस्ते गाळपाचा शुभारंभ करण्यात आला.

तर ताबडतोब जिल्हा बँक पैसे देईल
खडसे पुढे म्हणाले की, तालुक्याचा दळण वळणात महत्त्वाची भूूमिका असलेला कारखााना दहा वर्षांपासून बंद पडलेला कारखान्याला यापुढे कुठलीही आर्थीक मदत लागली तर जिल्हा बँकेकडे मागणी करा ताबडतोब पैसे देतो, असा विश्वास यांनी चित्रसेन पाटील यांना दिला.

मदत मागा लागलीच देतो -सुरेश जैन
यावेळी बोलताना माजी मंत्री सुरेश जैन म्हणाले की, चित्रसेन पाटील यांनी साखर कारखाना सुरू करण्याचं दिव्य स्वप्न पाहिले होते. त्यासाठी परिश्रम करून त्यांनी कारखाना सुरू केला आहे. यामुळे त्यांना उज्वल भविष्य आहे. कारखान्याला कुठलीही मदत लागली माझ्याकडे व नाथाभाऊंकडे मागा ते दिल्याशिवाय राहणार नाही.

राज्यासाठी आता चाळीसगाव पॅटर्न -रणजीत पाटील
यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले की, चित्रसेन पाटील यांनी भुमीपूत्रांना सोबत घेवून हा कारखाना सुरू केल्याने राज्यात अडगळीत पडलेल्या साखर कारखान्यांबाबत नवा चाळीसगाव पॅटर्न उदयास आला आहे.

शेतकर्‍यांच्या विकासाआड येणार्‍यांचा सत्यानाश होवो -गुलाबराव पाटील
राजकीय फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांच्या विकासाच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश होवो इडापिडा टळो व शेतकर्‍यांचा विकास व्होवो शेतकर्‍यांवर चेहर्‍यावर हास्य निर्माण होण्यासाठी चित्रसेन पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी एक आगळे-वेगळे उदाहरण दिले आहे. मलाही माझ्या मतदार संघातला साखर कारखाना सुरू करावयाचा आहे यासाठी चित्रसेन पाटील यांच्याकडे त्यांनी चर्चेची तयारी दर्शविली.

वैभवाचा साक्षीदार जिवंत ठेवल -आर.ओ.पाटील
पाचोर्‍याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी चित्रसेन पाटील यांच्या या धडाडीचे कौतूक केले. कारखाना सुरू होणार नाही. अशा बाता अनेक मारत होते. मात्र चित्रसेन पाटील अथक पीरश्रम घेत तालुक्याच्या वैभवाचा साक्षीदार जिवंत केला आहे त्याची भरभराट होवो असा आशिर्वाद त्यांनी दिला. यावेळी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी प्रास्ताविकातून कारखान्यासाठी दोन वर्षांच्या कालखंडाच्या संघर्षाची कहानी उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एम. पाटील यांनी तर आभार भाजप नेते यु.डी. माळी यांनी केले. य

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अंबाजीचे संचालक प्रविणभाई पटेल, दिलीपदादा चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, मानिकचंद लोढा, गिरीषभाई पटेल, अरूण निकम, डॉ. एम. बी. पाटील, विजयकुमार अग्रवाल, अ‍ॅड. धनंजय ठोके, उद्धवराव महाजन, किरण देशमुख, अजय शुक्ला, सुशिलकुमार जैन, प्रशांत मोराणकर, अभय विनायक वाघ, एकनाथ चौधरी, अशोक ब्राह्मणकार, निशांत मोमाया, डॉ. मुकूंद करंबेळकर, प्रदीप धामणे, श्रीराम गुप्ता, शरद मोराणकर, रविंद्र पाटील, हिंमतभाई पटेल, डॉ. मंगेश वाडेकर, निलेश वाणी, गोरख राठोड, सुजित वर्मा, रफिक शेख, जगदिश पाटील, रमेश पाटील, निलेश निकम, डॉ. अभिजीत पाटील, सौ. पन्ना लोढा, वर्षा महाजन, मोनिका पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक नामदेव पाटील, सुभाष भाकरे, अर्जुन शिंदे, चिप केमि. अशोक मेमाणे, प्रशासन अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह सर्व भागधारक कर्मचाच्यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी चित्रसेन पाटील यांचा संगमनेर कृ.उ.बा. समितीचे सभापती अनिल देशमुख यांनी फेटा बांधुन सत्कार केला. यावेळी उपस्थित शेतकरी व मान्यवरांनी टाळ्या वाजवून चित्रसेन पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रामराव जिभाऊ यांच्या भगिनी कुसूमताई भामरे यांचा सत्कार मोनिका पाटील, पन्ना लोढा, वर्षा महाजन यांनी केला. याप्रसंगी जिल्हाबँकेचे दिवंगत संचालक वाडीलाल राठोड यांची आठवण काढून चित्रसेन पाटील यांनी आजचा दिवस हा लोकसहभाग दिन साजरा करण्याचे यावेळी जाहिर केले.

संत महंतांच्या आशिर्वादाने प्रारंभ
गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित प.पु. महामंडलेश्वर 1008 स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपले मौन सोडत चित्रसेन पाटील यांना आशिर्वाद दिले. भुमीपूत्रांनी एकत्र येवून शेतकर्यांचे आसु पुसण्याचे केलेले काम पुण्याचे आहे. त्यामुळे त्यांना साधु संतांचा आशिर्वाद आहे. यावेळी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या डोक्यातील फेटा काढून तो चित्रसेन पाटील यांच्या डोक्यात घातला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला.

बेलगंगा साखर कारखाना देणार शेतकर्‍यांना दोन हजार रूपये भाव- चित्रसेन पाटील
आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे.संतांच्या आगमनामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. तालुक्यातील ज्या नेत्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून हा वारसा पुढे न्यायचा आहे.गेल्या दोन वर्षापासून कारखान्याचे काम सुरु होते.कारखाना विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापासून ते कारखाना सुरु करण्यापर्यंत लागलेला पैसा आणि मिळालेेले सहकार्य यांचा आढावा व कारखाना सुरु करण्यासाठी भूमिपुत्रांकडून मिळालेली मदत याचा उल्लेख केला.अंबाजी गृपने कारखाना विकत घेऊनही सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यास आठ महिने उशिर झाल्याने गळीत हंगामला एक महिना उशिर झाला. कारखाना सुरु होणार असल्याने तालु्नयात 125 कोटीचे चलन फिरेल. हा अमृत कलश आहे. पुढच्या तीन वर्षात 5 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट आहे. कारखान्याची 188 एकर जमिनीवर भविष्यात शेतीपुरक उद्योग तसेच दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरु केला जाईल. तसेच संपूर्ण तालुका 100 टक्के उस लागवड ठिबकवर करण्याचा प्रयत्न राहील. कारखान्याचा केंद्रबिंदु शेतकरी असल्याने सर्वांना कारखान्याच्या प्रक्रियेत समावून घेतले जाईल. उस उत्पादक शेतकर्‍यांना कमीत कमी 2 हजार रूपये व गरज भासल्यास शेजारच्या कन्नड कारखान्याचा भाव जास्त असल्यास तो फरक दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी चित्रसेन पाटील यांनी दिली.