कारचा अपघात; शिक्षकाचा मृत्यू

0

जळगाव । सावदा- न्हावी गावादरम्यान भरधाव येणार्‍या कारचे  पुढचे टायर अचानक फुटल्याने कार उलटली. अपघातात वरणगाव येथील उर्दू शाळेच्या शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर फैजपुर येथे उपचार सुरु आहे. याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, न्हावी येथील रहिवाशी सैय्यद नुरअली कुदरत अली (वय-55) हे वरणगाव येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या फकरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी होते.

जखमी पाच जणांवर फैजपुर येथे उपचार
यावेळी सावदा-न्हावी दरम्यान असलेल्या कारखान्याजवळील वळणावर भरधाव कारचे क्लिनर साईडचे टायर अचानक फुटल्याने कारमधील सैय्यद नुरअली कुदरतअली हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारार्थ जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना सैय्यद नुरअली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक व मित्र परिवारांनी जळगावी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेवून हळहळ व्यक्त केली. या अपघातात मुशीर खान समशेर खान, त्यांच्या पत्नी नसरीनबी मुशीर खान, सैय्यद शोएब सैय्यद नुरअली, तन्वीर अली सैय्यद नुरअली व जुनेद अली अन्वर अली रा. सर्व न्हावी यांच्यावर फैजपुर येथे उपचार सुरु आहे

सैय्यद नुरअली कुदरत अली त्यांच्या मोठ्या मुलीची प्रसुती झाली असल्याने ते जळगावी त्यांचा मित्र कार चालक व मालक मुशीर खान समशेर खान त्यांची पत्नी नसरीनबी मुशीर खान यांच्यासह सैय्यद अली कुदरत अली यांचा मुलगा सैय्यद शोएब व तन्वीर अली दोघे असे एकूण पाच जण मुशीर खान यांच्या (एमएच 06 एएन 7305) क्रमांकाच्या टाटा सुमो कारने न्हावीकडे जात होते.