कारचे टायर फुटल्याने दोन जणांचा मृत्यू

0

कामशेत :– पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर धावत्या कारचे टायर फुटल्याने अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज कामशेत बोगद्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास झाला.

ईर्टिगा कार (एम एच 03 / सी बी 8684) ही गाडी कामशेत बोगद्याजवळ आली असता अचानक कारचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेच्या कठड्यावर आदळली. कारमध्ये एकूण आठ प्रवासी होते. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी द्रुतगती महामार्ग पोलीस, कामशेत पोलीस दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.