कारमधून चोरट्यांनी लांबविली बॅग

0

जळगाव। नवीन बसस्थानकावर पत्नीला सोडण्यासाठी आलेल्या प्रौढाच्या कारमधून अज्ञात चोरट्याने बॅग लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. बॅगेत असलेले महत्वाचे कागपत्र, दोन एटीएम कार्ड व एक मोबाईल हे चोरीला गेले आहे. यानंतर दुपारी याप्रकरणी प्रौढाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पिंप्राळा येथील दांडेकर नगरात शशिकांत चिंधू ठाकरे हे कुटूंबियांसोबत राहतात. मंगळवारी सकाळी ते पत्नी अलका यांना नवीन बसस्थानकावर सोडण्यासाठी इंडिका कारने निघाले होते. नवीन बसस्थानकावर आल्यानंतर कार उभी करण्यासाठी जाग नसल्याने त्यांनी समोरच असलेल्या चिमुकले राममंदिराजवळ कार उभी करून पत्नीला सोडण्यासाठी बसस्थानकावर गेले. त्या दरम्यान, मोबाईलवर फोन आल्याने कारचे दरवाजे लॉक करण्याचा त्यांना विसर पडला. हिच संधी साधत साधत चोरट्यांनी त्यांच्या कारमध्ये ठेवलेली बॅग चोरून नेली. पत्नीला सोडून आल्यानंतर ठाकरे कारजवळ परतले असता त्यांना त्याची बॅग दिसून आली नाही. कारचे दार नसल्यामुळे चोरट्यांनी हात साफ केल्याची खात्री त्यांना झाली. यावेळी बॅगेत दोन एटीएम कार्ड, एक मोबाईल व किरकोळ रक्कम होती. ती चोरट्यांनी चोरून नेली. अखेर दुपारी शशिकांत ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर ठाकरे यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली.