भुसावळ । शनिवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्त शहर व परिसरातील कार्तिक स्वामी मंदिरात पहाटे पूजन तसेच अभिषेक करण्यात आला. मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील म्युनिसीपल पार्क भागातील श्रीराम मंदिरात असलेल्या कार्तिक स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक आणि पूजन सकाळी सात वाजेपासून प्रारंभ करण्यात आला. यानंतर आठ वाजता आरती करण्यात आली. शहरातील महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वरणगाव आयुध निर्माणीतील मंदीर दर्शनासाठी खुले
वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीमधील अय्यपा मंदीरातील कार्तिक स्वामीचे मंदिर शनिवारी त्रिपुरारी पौणिमेनिमित्त दुपारी 11 वाजेपर्यंत महिलांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. वर्षातून एकच दिवस महिलांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते. अय्यपा समाज मंडळातर्फे पुजन, अभिषेक करण्यात आला.