नवापूर । येथे हिंदू संस्कृती परंपरेनूसार कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षाप्रमाणे या वर्षीही श्री स्वामी समर्थ केंद्र परिवाराकडून मोठ्या थाटामाटात तुलसीविवाहचे आयोजन करण्यात आले. यावेळी वर म्हणुन सिध्देश दिनेश वानखेडे व वधु म्हणुन कल्याणी मुकेश देसले तसेच सुरेश पाटील व संगिता पाटील यजमान झाले होते. महिलांनी आपल्या कुलदेवतासह श्री गणेशाची आणि तुळशीची मंत्रोच्चारात विधिवत पूजा केली. मंगलाष्टके म्हणण्यात आली आणि वाजंत्रीच्या गजरात व फटाक्याचा आतीष बाजीत तुळशीविवाह लावण्यात आला. यावेळी सर्वांनी सर्वांना सुखशांती,आरोग्य लाभू दे अशी देवाकडे प्रार्थना केली.
सर्वांनी बोर भाजी आवळा-ऊठ ऊठ सावळा(विठोबा)असे आवळणी करून देवांना आता विवाह सोहळे सुरू होऊ दे अशी प्रार्थना केली. या पूजेला पाच ऊसांची झोपडी-खोपडी उभारली जाते म्हणून या तुळशी विवाह विधीला खान्देशात खोपडी पूजा ही म्हटले जाते. यावेळी मार्गदर्शक मा अशोक रणधीरे उपस्थित होते. पौराहित्य गोपाल पाटील ह्यांनी केले यावेळी परिसरातूल नागरीक युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.