कार्तिकेयचा शाळेतर्फे सत्कार

0

शहादा । येथिल व्हालंटरी विद्यालयातील विद्यार्थी कार्तिकेय याने 12विच्या परीक्शेत 90.15 टक्के गुण मिळवून जिल्यात प्रथम क्रमांक पटकविला त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात आले. नुकताच जाहीर झालेला बारावीच्या निकालात कार्तीकेय रविंद्र अहिरे याने हे यश संपादित केले.

यावर्षी शाळेचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल 97.70 टक्के लागला. तालुक्यात सर्वाधिक निकाल या शाळेचा लागल्याने सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे सचिव अ‍ॅड.राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, प्राचार्य नम्रता पाटील, कार्तिकेयचे वडील रविंद्र अहिरे, क्रांती जाधव शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.