रावेर : तालुक्यातील मोरगाव येथील वाय.व्ही. पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. 27 रोजी वाघोड येथे आयोजित शिवसेना शाखा उद्घाटनप्रसंगी त्यांनी प्रवेश घेतला. याप्रसंगी प्रख्यात मराठी अभिनेते शरद पोंक्षे, जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील, युवासेना प्रमुख अविनाश पाटील आणि तालुका व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.