धुळे। पं डीत दीनदयाल जन्म शताब्दी निमित्त येत्या 26 मे पासून कार्यकर्ते विस्तारक व पालक म्हणून घरोघरी जातील व पक्षाचे विचार ध्येयधोरण व पंडीत दीनदयाल यांचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्याचे काम करतील. सध्या कुठलीच निवडणूक नाही तरीसुध्दा भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जावून पक्षाचे ध्येयधोरण व पंडीत दीनदयाल यांचे विचार, जीवनकार्य सांगतील, असे भाजपा प्रदेश चिटणीस तथा धुळे जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. पंडीत दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षनिमित्त भाजपा धुळे जिल्हा ग्रामीणचा विस्तारक अभ्यास वर्ग तालुक्यातील नगाव पाटील शैक्षणिक संकुल नगाव येथे नुकताच उत्साहात पार पडले. त्यावेळी लक्ष्मण सावजी यांनी अभ्यास वर्गाचा उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांचे विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
यावेळी लक्ष्मण सावजी हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पंडीत दीनदयाल एक युगद्रष्टे नेते होते. पंडीतजी आम्हाला नेतृत्व आणि आवश्यकतेची पूर्ती या कलेत निष्णात भारतीयांना उच्च आदर्शांची एक अनुकरणीय शिडी देवून गेले. त्या आदर्शांचा आपल्या जीवनात समावेश करुन भारत मातेला विकासाच्या मार्गावर पुढे नेणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गाचे प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात 120 विस्तारक व 120 पालक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना देण्यात आलेल्या गणात व नगरपालीका क्षेत्रातील प्रभागात 25 मे पासून ते 10 जुन पर्यंत आपला प्रवास करुन दिलेली जबाबदारी यशस्वी करतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला समारोप
अभ्यास वर्गाच्या दुसर्या सत्रात विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर यांनी तर अभ्यास वर्गाचा तिसर्या सत्रात माजी प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले. अभ्यास वर्गाचा समारोप व चवथ्या वर्गाला मार्गदर्शन करतांना भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्राबँक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी योजना राबवत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे योेजना, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले असून अनेक जनकल्याणकारी योजना केंद्र व राज्यसरकार राबवत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रदेश सदस्य अॅड.संभाजी पगारे, भिमसिंग राजपूत, डॉ.शशिकांत वाणी, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हासरचिटणीस वसंतराव बच्छाव, अरुण धोबी, जिल्हाउपाध्यक्ष देवेंद्र पाटील, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाणे, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर वैद्य, प्रा.अद्वय वैद्य आदी उपस्थित होते. अभ्यास वर्गाचे सुत्रसंचालन जिल्हासंघटन सरचिटणीस किशोर सिंघवी यांनी केले तर सत्राचे आभार जिल्हासरचिटणीस वसंतराव बच्छाव, अरुण धोबी, जिल्हाउपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी मानले.