कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये-अजित पवार

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये असे आवाहन केले आहे. बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भावी मुख्यमंत्री म्हटल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातात किंवा कोणाला पसंत पडत नाही. त्यातून पाडापाडी होऊ शकते. त्यामुळे यापुढे असे काहीही म्हणू नका आणि आघाडीला बहुमत कसे मिळवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. एका स्थानिक नेत्याने आपल्या भाषणात अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला होता. तोच धागा पकडून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना असा उल्लेख न करण्याची विनंती केली.

यावेळी त्यांनी माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीही भाष्य केले. कोणी काय करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूर मातूर उत्तरं देत आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपाची पिछेहाट झालीय. त्यामुळे कर्जमाफी देऊ