कार्यकर्त्यांनो गट-तट विसरून कामाला लागा

0

शिरूर । आगामी निवडणुकांमध्ये मनसेला मोठे यश मिळणार असून त्यादृष्टीने गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे मनसेचे प्रवक्ते व नेते अविनाश अभ्यंकर यांनी शिरूर येथील बैठकी दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभुमीवर शिरूर येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मनसेचे नेते व प्रवक्ते अभ्यंकर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद व गणेश म्हस्के, अनिल चितळे, कैलास नरके, सुशांत कुटे, संदिप कडेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राज ठाकरे लवकरच शिरूरच्या दौर्‍यावर
भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी झाले आहे. जनतेला भुलवून भाजप सत्तेत आले असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी यावेळी केला. तालुक्यातील समस्यांचा अहवाल दिल्यानंतर स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महिनाभरात दौर्‍यावर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जय गायकवाड, विशाल अलभर, अनिकेत खोतकर, गणेश जाधव यांसह बचत गटांच्या महिलांनी मनसेत प्रवेश केला असल्याची माहिती शहराध्यक्ष सुशांत कुटे यांनी दिली.