कार्यक्षम लोक प्रतिनिधीमुळेच विकास शक्‍य : आमदार संजय सावकारे

0

भुसावळ :- नगरपालिका असो व विधानसभा यामध्ये योग्य लोकप्रतिनिधी निवडून गेला तरच विकास शक्‍य असतो, आता पालिकेत निर्णयक्षम लोकभावनांचे आदर करणारे नगरसेवक निवडून आल्यामुळे पालिकेतर्फे आगामी काळात विकासकामांचा धडाका सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात याचा विचार करुनच प्रतिनिधी द्यावा, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. ते आज प्रभाग क्रं.12 व 13 मधील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

शहरातील प्रभाग क्रं.12 व 13 मधील फालक नगर, लक्ष्मीनगर, प्रल्हादनगर, गडकरी नगर, सरस्वती नगर, शिवदत्त नगर, प्रल्हाद नगर, पंधरा बंगला भागात आरसीसी गटारींचे बांधकामांचे उद्‌घाटन झाले. यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ. सुनिल नेवे, भाजप शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, राजेंद्र आवटे, आरपीआयचे राजू सुर्यवंशी, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, मेघा वाणी, बोधराज चौधरी, सतिष सपकाळे, संजय आवटे, मुकेश गुंजाळ, उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी रमण भोळे म्हणाले की, मागील काही वर्षात रखडलेल्या विकासाला आता गती मिळणार आहे. आगामी काळात सर्वच कामे कायदेशिर असल्यामुळे कामांना वेळ लागणार आहे. अमृत योजनेंतर्गत शहरात सर्वत्र पाईप लाईनचे कामांना मंजुरी मिळालेली असून लवकरच पाईप लाईनचे काम सुरू होणार आहे. यावेळी युवराज लोणारी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजेंद्र आवटे यांनी केले. सुत्रसंचलन ज्ञानेश्‍वर चौधरी तर आभार प्रदर्शन चव्हाण यांनी मानले. यावेळी वार्डातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.