नंदुरबार । अनेक वर्षापासून तापी-बुराई प्रकल्प जलदी गतीने होण्यासाठी वारंवार प्रशासनाला लेखी कळऊनही दखल घेतली जात नव्हती म्हणून शिवसेनेने तापीपात्रात जल सत्याग्रह करून शासनाला वठणीवर आणण्याचे ठरविले. 3 ते 4 तास पाण्यात सत्याग्रह सुरू असतांना मध्यम प्रकल्पाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वर्षभराच्या आत नंदुरबार तालुक्यातील विरदेल, आसाने व शानीमांडळचे धरण भरल्या जाईल व दिरंगाई करणार्या ठेकेदारावर कार्यवाहीचे आदेश करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यावर शेतकर्यांनी यशस्वी आंदोलन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या सत्याग्रहात शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, तालुका प्र.रमेश पाटील, गुलाब पाटील, रवी भाबड, किशोर तांबोळी, संभाजी पाटील, रावसाहेब पाटील, मुकेश पाटील, रवी पाटील, वकील पाटील, डॉ.शर्मा, नाना गुरव, नाना पाटील, बंटी पाटील, संजय गिरासे, प्रविण गुरव, मनोज चव्हाण, विनोद पाटील, रवींद्र पाटील, तसेच पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी उपस्थित होते.