कार अपघातात 3 ठार

0

सांगली । पार्टीहून परतणार्‍या तरुणांची भरधाव कार सांगली-मिरज रस्त्यावरील एका झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला. निनाद आरवाडे, विकी चव्हाण, संमेद निल्ले अशी या मृत तरुणांची नावे असून अपघातात आणखी दोघे जण जखमी झाले.