कालच्या पडझडीनंतर सेन्सेक्स पुन्हा उसळला

0

मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे शेअर मार्केटमध्ये नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहे. काल सोमवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. काल सेन्सेक्स ६०० अंकांनी खाली आल्याने ३७ हजाराच्याजवळ आले होते. मात्र आज मंगळवारी शेअर बाजारात उत्साह दिसून आला आहे. ६१० अंकांनी वाढ होत सेन्सेक्स 37 हजार ५०० च्या पुढे गेले आहे. निफ्टीतही वाढ झाले आहे. १५६ अंकाच्या वाढीसह सेन्सेक्स ११ हजाराच्या पुढे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने शेअर मार्केटमध्ये विक्रीला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.