नवापूर। नवापूर तालुक्यातील गडद येथील विद्यार्थी रिकेश गणेश मावची (वय 13,) व हरीष संदिप मावची (वय 14, दोघेही रा- खेकडा) झामझरच्या कुलदिपक माध्यमिक विद्यालयात शिकत होते. तेे दोघेे गुरांना पाणी पाजण्यासाठी कालव्याकडे गेल्यानंतर पाय घसरुन पडल्याने कालव्यात बुडून मरण पावले.
यावेळी त्यांच्या सोबतच्या मित्रांनी त्यानां वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु कालव्यातील पाण्याचा व हवेचा वेग जास्त असल्यामुळे ते पाण्याचा मध्यभागी खेचले गेले, असे त्यांनी सांगितले. या दोघांच्या बचावाचे प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे लक्षात आल्यावर मित्रांनी खेकडा गावात पळत जाऊन ग्रामस्थांना ही घटना सांगितली. ही घटना समजताच तहसिलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम यांनी मयत विद्याथ्यार्ंंच्या घरी जाऊन कुंटुबियांचे सांत्वन केले.