जळगाव । शहरातील कालिंका माता मंदीर परीसरात खेमराज खडके यांच्या मार्गदर्शनात आज मोफत संधीवात गुडघेदुखी व इतर आजारांवर मोफत औषधोपचार करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील योगतज्ञ योगगुरू खेमराज खडके यांच्या मार्गदर्शनात कालिंका माता मंदीरा परीसरात सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान मोफत आरोग्या शिबीराचे आयोजन होणार असून या शिबीरात पुष्पौषधी, बाराक्षार, निसर्गोपचार, योगोपचार यांच्या मार्फत आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.