काळेवाडी : विजयनगर काळेवाडी येथील श्री मुनिसुब्रत स्वामी जैन मंदिरासमोर ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटल्यामुळे तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वारंवार तक्रार देऊनही कामे करीत नाही. तात्पुरती कामे केली जातात तरी कायमस्वरुपी काम करण्यात यावे, अशी मागणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी आयुक्तांकडे केली आहे.
याबाबतच्या निवेदनावर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर, ग प्रभागाचे सचिव प्रसाद देवळालीकर, ड प्रभागाचे अध्यक्ष जयवंत कुदळे, ड प्रभागाचे उपाध्यक्ष वैभव कादवाने, सचिव भास्कर घोरपडे, काळेवाडी शाखेचे अध्यक्ष सोहनलाल राठोड यांनी मागणी केली आहे.