काळेवाडी फाटा परिसरात साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त

0
अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी-चिंचवड : संशयित टेम्पोचा पाठलाग करून एका टेम्पोतून 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटे वाकड येथे काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुसर्‍या दिवशी ही कारवाई केली. या पथकाने टेम्पोचालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय 29, रा. वैभवनगर, पिंपरी) याला अटक केली आहे.
टेम्पोचा केला पाठलाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाला गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास काळेवाडी फाटा परिसरात संशयित टाटा एस मिनी टेम्पो दिसला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीचा तब्बल 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे माहिती देऊन कारवाई करत गुटख्यासह वाहन जप्त केले.
यांनी केली कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उप निरिक्षक वसंत मूळे, पोलीस कर्मचारी प्रदिप शेलार, राजन महाडीक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बि.के.दौंडकर, बाळासाहेब सुर्यवंशी, टी. डी. घुगे, आर डी बांबळे, ए.डी.गारगोटे, प्रदिप गुट्टे यांच्या पथकाने केली.