पिंपरी : बहिणीच्या शोधात आईसोबत चाललेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना काळेवाडी घडली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने पंजनाथन कृष्णन (वय 50) मारिया पंजनाथन कृष्णन (वय 29, दोघेही रा. काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. ही तरुणी आपल्या आईसोबत बहिणीच्या शोधात काळेवाडी येथे जात असताना दोन इसमांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून तिचा विनयभंग केला. तसेच क्रूरतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या शरीराचा चावा घेतला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.